TheMedia18.com | अपडेट: १२ मार्च २०२६
सोलापूर: दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या रिक्त असलेल्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड प्रक्रिया आज अत्यंत उत्साहात पार पडली. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने सभापती पदासाठी श्री. संदीप अमृत टेळे यांची, तर उपसभापती पदासाठी वर्षा सोमनाथ पटणे यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे.
या निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. युवा नेते मनीष भैया देशमुख यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे नाव जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे जंगी स्वागत केले.
(व्हिडिओ: निवड जाहीर होतानाचा ऐतिहासिक क्षण)
आमदार सुभाष बापू देशमुख आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. यावेळी युवा नेते मनीष देशमुख, राज्यपरिषद सदस्य हणमंत कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य रामप्पा चिवडशेट्टी, नेताजी खंडागळे, महेश बिराजदार, सांगपा केरके, यतीन शहा, अतुल गायकवाड, जगनाथ गायकवाड यांच्यासह सर्व पंचायत समिती सदस्य आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित सभापती संदीप टेळे सावकार आणि उपसभापती वर्षा पटणे यांच्या निवडीमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपची पकड अधिक मजबूत झाली असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

