52 लवंगा येथील ग्रामदैवत श्री करणी मलकारसिद्ध यात्रेनिमित्त धार्मिक सोहळ्याला सुरुवात झाली आहे. यात्रेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून श्री मंगरायसिद्ध तेरवाड या देवास अत्यंत भक्तिभावाने ‘भंडारा’ अर्पण करण्यात आला.

यात्रेचा मुख्य सोहळा १८ मार्च २०२६ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. भंडारा अर्पण करण्याच्या या कार्यक्रमावेळी भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. देवाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

श्री करणी मलकारसिद्ध देव, 52 लवंगा | भक्तीने भरलेलं मन,चरणी ठेवितो विश्वास |
#LavangaYatra #Malkarsiddha #TheManojBhakti #SolapurNews #Bhandara #Yatra2026
