मधला मारुती चौक सज्ज; १९ ते २३ मार्च दरम्यान भक्तीचा जागर
मंद्रुप (दक्षिण सोलापूर): सोलापूर जिल्ह्यातील मंद्रुप येथील मधला मारुती चौक परिसरात, सालाबादप्रमाणे यावर्षीही ‘अखंड हरिनाम सप्ताह व श्रीशिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळा (वर्ष ५ वे)’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा मंगलमय सोहळा गुरुवार, १९ मार्च २०२६ ते सोमवार, २३ मार्च २०२६ (चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध पंचमी) या कालावधीत संपन्न होणार आहे.
गुरुवर्य ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ) आणि ह.भ.प. संजय पाटील महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडत आहे. जय हनुमान भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ मंद्रुप यांच्या वतीने आयोजित या महोत्सवात सर्व भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन करण्यात आले आहे.
📍 कार्यक्रम स्थळ: मधला मारुती चौक, मंद्रुप, ता. द. सोलापूर.
ताज्या बातम्या आणि भक्तीगीते मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा.
© 2026 TheMedia18.com. All Rights Reserved